सामाजिक

शिरूर मध्ये ७७ वा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा


शिरूर प्रतिनिधी …

शिरूर तहसील कार्यालयाच्या आवारात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे उपस्थित होते.

शिरूर नगरपरिषदेत नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्याधिकारी प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष मितेश गादिया व नगरसेवक उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत सहाय्यक निबंधक सहकार तथा प्रशासक हरिश्चंद्र कांबळे यांच्या हस्ते, तर खरेदी-विक्री संघात सभापती राजेंद्र नरवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सचिव अनिल ढोकले उपस्थित होते.
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सचिव नंदकुमार निकम व प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते उपस्थित होते. विद्याधाम प्रशालेत शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य राजेंद्र भटेवरा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्याध्यापक गुरुदत्त पाचर्णे उपस्थित होते.
आयेशा बेगम उर्दू हायस्कूलमध्ये कॅप्टन विश्वनाथ मांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सचिव मोहम्मद हुसेन पटेल, मुख्याध्यापक फारुख सांगलीकर उपस्थित होते. लाटेआळीतील आझाद सोशल फाउंडेशन येथे नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. व्यवस्थापक नसीम खान, सागर बोरगे उपस्थित होते. मुस्लिम जमात जामा मशिद येथे सभापती आयेशा सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.न्यू इंग्लिश रयत शाळेत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व माजी उपनगराध्यक्ष जाकिर खान पठाण यांच्या हस्ते, सिताबाई थिटे फार्मसी कॉलेजमध्ये कॅप्टन विठ्ठल वराळ यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. प्राचार्य डॉ. अमोल शहा उपस्थित होते. ज्ञानगंगा विश्वविद्यालयात पोलीस उपाधीक्षक प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, धर्मेंद्र खांडरे,संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे व अमृतेश्वरी घावटे व पालक प्रतिनिधी श्यामकांत वर्पे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले.वन विभागाच्या कार्यालयात तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डेक्कन स्कूलमध्ये माजी सैनिक बाळासाहेब शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, समूहगीत, भाषणे, लाठी-काठी व तलवारबाजीची प्रात्यक्षिके तसेच रोबोटचे सादरीकरण केले.बालाजी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रल्हाद कचरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अध्यक्ष सदाशिव पवार, मुख्याध्यापक विनायक म्हसवडे उपस्थित होते.
     विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले . ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिरूर शहरात शालेय विद्यार्थ्यांनी सकाळी प्रभातफेरी काढत ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून सोडला.

जनता NEWS 24

मुख्य संपादक : बबन वाघमारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *