शिरूर नगर परिषदेची सत्ता भाजपाच्या हाती दिल्यास शिरूरचा सर्वांगीण विकास निश्चित – जयश्री पलांडे”

जनता न्युज 24
शिरूर नगरपरिषदेची सत्ता भाजपाकडे दिल्यास शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि विविध विकासकामांना वेग देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून “विकासाची गंगा” शिरूरमध्ये आणण्याचा विश्वास पुणे जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा तथा भाजपाच्या नेत्या जयश्री पलांडे यांनी व्यक्त केला. शिरूर नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचार फेरीदरम्यान त्या कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधत होत्या. या प्रचार फेरीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा राजेंद्र लोळगे, नगरसेवक पदाचे उमेदवार करण खांडरे, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रिया बिरादार, उपाध्यक्षा सुष्टी करंजुळे, निलू शर्मा, ॲड. आदित्य लोळगे आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना जयश्री पलांडे म्हणाल्या की,“केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे. शिरूर शहरातही सत्ता आल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तेवढा निधी मोठ्या प्रमाणात खेचून आणण्यात येईल. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी शहरात ‘फडणवीस मॉडेल’नुसार भरीव कामे करण्यात येतील.”भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा लोळगे तसेच सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करताना त्यांनी नागरिकांनी या निवडणुकीत विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.

मुख्य संपादक : बबन वाघमारे
