राजकीय

सर्व सामान्यांचा विकासासाठी सरकार काम करत आहे : उपमुख्यमंत्री अजित पवार


शिरूर प्रतिनिधी

  शिरूर नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सभा शिरूर  शहरातील पाचकंदिल चौकात झाली. यावेळी बोलताना अजितदादा पवार म्हणाले की आम्ही  सर्व सामान्यांचा विकासासाठी सरकार काम करत आहे.महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत शिरूर शहर झपाट्याने मोठ्या प्रमाणावर वाढत आहे  शिरूर शहरालगत कारेगाव ,कर्डे, रांजणगाव,सुपा अशा  अद्योगिक वसाहती विस्तारत आहेत शिरूर शहर हे वाढत आहे वाढत्या शहरीकरणाचा वेग लक्षात घेऊन शहराचा विकास नियोजनबद्ध  होणे गरजेचे आहे. शिरूर शहराचा कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जी काही मदत लागेल ती करण्याची तयारी असल्याचे सांगून क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिरूर शहराच्या हद्द वाढीचा प्रश्न सर्वांना विश्वासात घेऊन निकाली काढण्यात येईल . शिरूर शहर हे शैक्षणिक केंद्र कसे बनेल त्या दष्टीने काम करू असे  म्हणाले. शिरूर नगर परिषदेच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला शिरूरची बाजारपेठ चांगली असली पाहिजे. कायदा सुव्यवस्था चांगली पाहिजे जर कोणी कायदा हातात घेत डिंग डॉंग करत असेल तर त्याला सोडणार नाही तो कोणीही मोठा  असो आमच्या जवळचा असला तरी किंवा लांबचा असला तरी त्याला सोडणार नाही. आमच्याकडे सर्वाना समान न्याय असणार असल्याचा इशारा देत दहशत खपवून घेतली जाणार नाही असे अजित दादा पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केंद्रात व राज्यात महायुतीत  सत्तेतअसून काम करून घेण्याची क्षमता आमच्यात आहे प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर नगर परिषदेला पक्षावर निवडणूक लढवीत असून शिरूर नगर परिषदेत आम्ही प्रकाश  धारीवाल यांच्या शिरूर शहर विकास आघाडी बरोबर निवडणुकीस सामोरे जायचो यात मी कधीही हस्तक्षेप केला नाही.
काहीजण चुकीचे सांगतात की अजित पवार यांनी जास्त जागा राष्ट्रवादीला मागितल्या प्रकाश  धारीवाल यांनी मला स्पष्ट पणे सांगितले की माझ्या उद्योग व्यवसायामुळे मी निवडणुकीत नसणार आहे  . त्या पार्श्वभूमीवर पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आमदार माऊली कटके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सर्वसमावेशक पॅनल उभे केला सुशिक्षित विकासाची जाण असलेले कार्यक्षम उमेदवार दिले आहेत या पॅनलच्या पाठीशी शिरूरकर जनतेने आपली ताकद उभी करावी असे अजितदादा पवार म्हणाले. यावेळी विनोद भालेराव निलेश लटांबळे निलेश गाडेकर अविनाश घोगरे विठ्ठल पवार अभिजीत पाचर्णे या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे व नगरसेवक पदाच्या  उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आव्हान अजितदादा पवार यांनी  केले.
शिरूर शहरासाठी ७१ कोटीची पाणीपुरवठा योजना प्राथमिक शाळा इमारतीसाठी तीन कोटींचा निधी
गेल्या अडीच वर्षात शहरासाठी सुमारे ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला विद्यमान खासदाराने शिरूर शहरासाठी आत्तापर्यंत किती निधी दिला आहे मी माजी खासदार असूनही शिरूर साठी निधी दिला असे आढळराव पाटील यांनी सांगितले.
आमदार माऊली कटके म्हणाले की शिरूर शहर हे पुणे जिल्ह्यातील अग्रगणने शहर बनविण्याचा ध्यास असून शासनाने शहरातील भुयारी गटार योजनेसह पाणी पुरवठा योजनेसाठी निधी दिला आहे. शिरूर शहर हद्दवाढीचा ही प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे कटके म्हणाले.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ऐश्वर्या पाचर्णे म्हणाल्या की शिरूर शहराला नवे रूप दिशा देण्याची वेळ आली असून रसिकभाऊ धारिवाल व प्रकाश धारीवाल यांनी शिरूर शहराच्या विकासाला वेगळी उंची व रूप दिले स्वर्गीय माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनीही शिरूर शहराच्या विकासासाठी योगदान दिले. आता अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार माऊली आबांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला नवी दिशा द्यायची आहे मी नगराध्यक्ष पदाचे निवडणूक लढवीत असून सामान्य शिरूरची जनता माझ्या पाठीशी उभी राहिला असा मला विश्वास आहे.
यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार पोपटराव गावडे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, संचालक सुधीर फराटे, राहुल जगताप शशिकांत दसगुडे ,विठ्ठलराव ढेरंगे , श्रीनिवास घाडगे ,दिलीप वाल्हेकर, महेश ढमढेरे, शरद कालेवार ,आरती भुजबळ व आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राष्ट्रवादीचे  प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांनी आभार मानले.

जनता NEWS 24

मुख्य संपादक : बबन वाघमारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *