चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या प्लेसमेंटमधून ग्रामीण भागातील १५२ विद्यार्थ्यांना टीसीएसमध्ये रोजगार
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून, महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या मुलाखतीत एकूण १५२ विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे.
महाविद्यालयात शिक्षण घेणारे बहुसंख्य युवक-युवती हे ग्रामीण भागातील असल्याने, पदवी मिळाल्यानंतर किंवा पदवी पूर्ण होण्यापूर्वीच नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या निवड प्रक्रियेसाठी महाविद्यालयातील बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.सी.एस., बी.बी.ए. आदी सर्व विभागांतील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या मेगा कॅम्पस ड्राइव्हमध्ये विद्यार्थ्यांना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये नोकरीच्या संधीबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते यांनी केले
मा. प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते व उपप्राचार्य प्रा. एच. एस. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्लेसमेंट सेलचे प्रमुख व समन्वयक डॉ. योगेश सेठी यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.महाविद्यालयाचा प्लेसमेंट सेल इन्फोसिस, विप्रो, आयसीआयसीआय बँक तसेच इतर नामांकित कंपन्या व बँकांना सातत्याने आमंत्रित करत असून, विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी वर्षभर कार्यरत असतो. डॉ. योगेश सेठी आणि डॉ. अमोल साठे, डॉ. अजित चंदनशिवे, डॉ. बिरोबा बेळे, प्रा. तुषार डाळिंबकर, आणि प्रा. अमोल पितळे , प्रा. किरण टाकसाळे, डॉ. मंजुषा पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आयुष्यातील मोठी संधी मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलने केलेल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशभाऊ धारिवाल संस्थेचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर,सचिव नंदकुमार निकम यांच्यासह सर्व मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : बबन वाघमारे
