सामाजिक

शिवगौरव उत्सवात शिरूरच्या सनी जाधवांचा गौरव — युवा गौरव पुरस्काराने सन्मान


 

शिरूर प्रतिनिधी

बबन वाघमारे

ऐतिहासिक लाल महालाच्या साक्षीने आज संपन्न झालेल्या ‘शिवगौरव गाथा’ या भव्य कार्यक्रमात महाराष्ट्राच्या राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा भावनिक सत्कार संपन्न झाला. श्री शंभूराज्याभिषेक ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील शिरूर ग्रामीण येथील युवा कार्यकर्ते सनी जाधव यांना ‘युवा गौरव पुरस्कार 2025’ हा मानाचा सन्मान देवून गौरविण्यात आले.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून सनी जाधव यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जगभरातील लोकप्रियता अधोरेखित करताना मंगेशजी चिवटे म्हणाले,

“महाराजांचे धर्मकारण, समाजकारण, अर्थकारण व राजकारण हे आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तरुणांनी महाराजांचा इतिहास अभ्यासून समाजासाठी कर्तव्यभावाने पुढे यावे.”

कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवचरित्रकार शेखर पाटील यांनी ऐतिहासिक घटनांचा वेध घेत महाराजांचा थोर इतिहास पुन्हा जिवंत केला.

या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून ॲड योगेश केदार, अनिल बापू जेधे, विराज धनकुडे, श्रीकांत पाटोळे, शाहीर वैभव खरात यांच्यासहअनेक मान्यवर उपस्थित होते.

श्री शंभूराज्याभिषेक ट्रस्टचे कार्याध्यक्ष निलेश दादा वाघुले, अर्जुन शेळके, महादेव पवार, सुरज शिंदे, सिताराम पाठक आणि इतर पदाधिकारी यांनी कार्यक्रमाची उत्तम सांगता केली.

सनी जाधव यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन दिला गेलेला ‘युवा गौरव पुरस्कार’ हा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.


जनता NEWS 24

मुख्य संपादक : बबन वाघमारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *