राजकीय

शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनता दल भाजपसोबत


शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनता दल भाजपसोबत

शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी जनता दल सेक्युलरने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा आणि जनता दलाच्या या युतीमध्ये जागावाटपामध्ये जनता दलाला शिरूर नगर परिषदेसाठी 2 जागा देण्यात आल्या आहेत.

शिरूर नगर परिषदेसाठी जनता दलाने ज्या उमेदवारांचे अर्ज भरले होते त्यामधील बेंद्रे यांनी आपला अर्ज पाठीमागे घेतला. काही तांत्रिक अडचणीमुळे जनता दलाच्या परदेशी यांचा अर्ज पाठीमागे घ्यायचे राहून गेले. त्या ठिकाणी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे व जिल्हाध्यक्ष संजय बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

शिरूर नगरपरिषदेत नाथाभाऊ शेवाळे यांच्या नेतृत्वातील जनता दल सेक्युलर आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीची ताकद सर्वांना जड जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


जनता NEWS 24

मुख्य संपादक : बबन वाघमारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *