राजकीय

भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन — महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे



शिरूर प्रतिनिधी–  बबन वाघमारे

 

 

 

          केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवून शिरूर शहराचा विकास साधला जाईल भाजपाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या. शिरूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शिरूर शहरात आले होते. शिरूर शहराचा सर्वे करून प्रॉपर्टी कार्ड वाटपाची प्रक्रिया करण्यात येईल. बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते  म्हणाले की हुडको कॉलनी संदर्भातील वर्ग दोनची प्रॉपर्टी वर्ग एक करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल व हुडकोतील घरे नावावर करण्याचा‌ विषय  काही महिन्यात मार्गी लावण्यात येईल. स्टेट बँक कॉलनी येथील खेळाच्या मैदानाच्या आरक्षण संदर्भातला प्रश्न व गुजर मळ्यातील खेळाच्या मैदानाचा  आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही  त्यांनी दिली . नगरपरिषदेची सत्ता भाजपाकडे आल्यास शिरूर शहराचे विविध प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे सांगून भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा लोळगे व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान त्यांनी केले. यावेळी आमदार महेश लांडगे, पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पलांडे,  तालुका अध्यक्ष राहुल पाचर्णे, धर्मेंद्र खांडरे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, प्रिया बिरादार, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुवर्णा लोळगे व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.


जनता NEWS 24

मुख्य संपादक : बबन वाघमारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *